ते छत्रपती आहेत मी मावळा आहे… असं म्हणणारे अमोल कोल्हे आज म्हणतात ‘देशात राजे कोणीच नाही!’

मुंबई |  काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडू नये म्हणून आर्जव केलं होतं. चर्चेनंतर मी मावळा आहे… ते छत्रपती आहेत… मी त्यांची कशी काय समजूत काढणार, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडताच अमोल कोल्हेंचा सूर पालटला आहे.

भारतात कुणीही राजे नाही. स्वातंत्र्यानंतर सर्व सामाज्र खालसा झालेली आहेत, असं म्हणत त्यांनी उदयनराजेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

जनतेच्या विकासासाठी आम्ही पक्ष सोडून जात आहे, असं पक्ष सोडून जाणारे नेते सांगत आहेत. मात्र जनता एवढी दुधखुळी राहिलेली नाही. जे पक्ष सोडून गेले ते स्वता:ची कातडी वाचवण्यासाठी गेले आहेत, हे जनतेला आता चांगलं समजतं, अशा शब्दात त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर आसूड ओढले.

कुणी कुठेही गेले तरी फरक पडत नाही. कारण शरद पवार आता व्यक्ती राहिली नसून विचार झाला आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही. शिवस्वराज येणार म्हणजे येणार…. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देणाऱ्या अमोल कोल्हेंना भारतात आता राजे कुणीच नाही, असा साक्षात्कार कसा काय झाला?? असे प्रश्न लोक सोशल मीडियावर उपस्थित करू लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या-