धक्कादायक! राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, पाहा व्हिडीओ…

मुंबई | देशाच्या सर्वांगिण विकासात महात्मा गांधीचं योगदान देश कधीच विसरू शकत नाही. स्वातंत्र्य संग्रामात आपल्या अहिंसावादी तत्वांनी महात्मा गांधींनी स्वातंत्रलढा अजरामर केला आहे.

महात्मा गांधीसोबतच्या वैचारिक वादातून नथुराम गोडसेनं महात्मा गांधींची हत्या केली होती. या घटनेनं देशासह जगाला स्तब्ध केलं होतं. आजही या वाईट घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या की देशात वाद उद्धवतो.

नथुराम गोडसेची बाजू घेऊन उघडपणे महात्मा गांधीच्या हत्येचं समर्थन करणारे अनेकजण देशात आणि राज्यात पहायला मिळतात. महात्मा गांधीना नथुरामनं का मारलं? हा प्रश्न सर्वांच्या मनात एक घर करून आहे.

महात्मा गांधीच्या हत्येनंतर देशभरातून गोडसेवर अनेक कलाकृती बनवण्यात आल्या. आता व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर मात्र आता राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर राजकारणात प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या नथुरामच्या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे.

नथुरामची भूमिका साकारल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा वाद उभा राहिला आहे. सर्वस्तरातून अमोल कोल्हेंवर टीका करण्यात येत आहे. हा चित्रपट 20 तारखेला प्रदर्शित होणार आहे.

नथुराम गोडसेला गांधींना मारल्याप्रकरणी फाशी देण्यात आली होती. त्यानंतर देशात आजही नथुरामच्या विचारांना मानणारे नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. अशात आता हा चित्रपट मोठ्या वादाला कारणीभूत ठरू शकतो.

दरम्यान, नथुराम गोडसे चित्रपटात एक अभिनेता म्हणून काम केल्यानं कोल्हे अडचणीत सापडले आहेत. प्रदर्शनापुर्वीच हा चित्रपटमुळं राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ – 

महत्त्वाच्या बातम्या – 

आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!

टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज

 बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, आता…