शेअर बाजार गडगडला! तीन दिवसात मोठं नुकसान, समोर आली ‘ही’ 4 महत्त्वाची कारणं

मुंबई | काही दिवसांपूर्वी शेअर बाजारात (Share Market) वाढ होत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांना चांगला फायदा मिळाला होता. अशातच आता गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसत आहे.

भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 1% पेक्षा जास्त घसरल्याचं दिसून आलं.

सेन्सेक्स 634 अंकांनी घसरला आणि 59,464 वर बंद झाला. तर निफ्टी देखील 181 अंकांनी कोलमडून 17,757 वर आलाय. ब्रॉडर मार्केट बेंचमार्क निर्देशांकापेक्षा कमी घसरल्याचं दिसतंय.

निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.16% आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.05% घसरला आहे. अशातच आता बाजारात होणाऱ्या घसरणीची 4 प्रमुख कारणं समोर आली आहेत.

वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गुंतवणुकदार बाजारातून काढता पाय घेताना दिसत आहेत.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FIIs भारतीय बाजारपेठेत सतत जोरदार विक्री करत आहे. त्यामुळे आता परकीय गुंतवणुकीचा आभाव बाजारात दिसत आहे.

मुंबई आणि दिल्लीसारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये कोरोना आणि ओमिक्राॅन रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यानं आता गुंतवणुकदार चिंतेत आहेत.सध्या भारतात 3 लाखाहून अधिक रूग्णसंख्या आढळत असल्याचं दिसतंय.

कंपन्यांचे डिसेंबरचे तिमाही निकाल जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, या तिमाहीतील निकाल निराशाजनक असल्याचं दिसतंय.

दरम्यान, येत्या 10 दिवसात देशाचं अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे आता शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 विराटच्या ‘त्या’ वक्तव्यावर गांगुली चांगलाच भडकला, घेणार होता मोठा निर्णय पण…

आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!

टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज

 बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी