…तर शिवराय त्यांना माफ करणार नाहीत- अमोल कोल्हे

मुंबई : एखादा बुरूज ढासळला म्हणून किल्ला पडत नसतो. जोपर्यंत मावळे पाठीशी आहेत, तोपर्यंत स्वराज्य हाती आहे. 18 वर्षे राजाशिवाय रयत लढली हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पुन्हा एकदा सेना-भाजपचे सरकार सत्तेत आले तर छत्रपती शिवराय आपल्याला कदापि माफ करणार नाहीत, असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिवस्वराज्य यात्रेमध्ये खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाठ फिरवली.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे गुरुवारी साताऱ्यात आगमन झाले. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस अमोल मिटकरी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.

आज महाराष्ट्रामध्ये तीन यात्रा निघाल्या आहेत. भाजपची महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. भाजपच्या यात्रेबाबत जनतेमध्ये संभ्रम आहे. पाच वर्षे काम केली असती तर मुख्यमंत्र्यांना यात्रा काढावी लागली नसती. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले जात आहे. असेही अमोल कोल्हे बोलले आहेत.

महत्वाच्या बातम्या-