“बाबा परत असं घोड्यावर बसायचं नाही”; अमोल कोल्हेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पुणे | 16 फेब्रुवारीला निमगाव दावडी येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार अमोल कोल्हे हे या शर्यतीला उपस्थित होते.

अमोल कोल्हे यांनी 2019 च्या निवडणूकीच्या प्रचारावेळी ‘आम्ही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करु आणि घोडीवर बसून बारी मारू’ असं म्हटलं होतं. त्यांनी शिवसेनचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उत्तर देताना हे वक्तव्य केलं होतं.

अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यत सुरू केल्यानंतर स्वत: पहिल्यांदा घोडीवर बसून बारी मारली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

अमोल कोल्हे यांचा हा व्हिडीओ त्यांच्या प्रेक्षकांनी, चाहत्यांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी व मित्र मंडळींनी पाहिला. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खासदार अमोल कोल्हे यांच्या या व्हिडीओ वर त्यांचे मित्र शेखर पाचूंदकर यांच्या आई लक्ष्मीबाई पाचूंदकर यांनी त्यांना घरी बोलावून घेतले. आणि “बाबा परत असा घोडीवर बसत जाऊ नकोस” अशी तंबी त्यांनी दिली.

मातोश्रींनी माझी नजर काढली. त्या माझी मातेसमान काळजी घेतात, त्यामुळे मला खूप बळ येतं, अशा भावना अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  “…हिशोब इथेच चुकते करणार”; निलेश राणे आक्रमक

  “सशक्त सरकारने सशक्त कारवाई करणे अपेक्षित आहे”; वरूण गांधींचा सरकारला घरचा आहेर

  ‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

  Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”

  येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा