“भष्ट्राचाराच्या पैशातून मुनगंटीवारांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला”

ठाणे | भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील 33 कोटी वृक्ष लागवडीत मोठा भष्ट्राचार केला. त्याच भष्ट्राचाराच्या पैशातून त्यांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला, असा गंभीर आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवक आशिष दामले यांच्या बदलापुरातील “दादास” जिमच्या उद्घाटन कार्यक्रमात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

सर्वात आधी सुधीर मुनगंटीवार यांच्या घराची चौकशी करायला हवी. ईडीची पहिली नोटीस त्यांनाच पाठवायला हवी. सुधीर मुनगंटीवार याचं घर तब्बल 500 कोटी रुपयांचं आहे. कलर कॉम्बिनेशनसाठी किचनचीही खास जोडणी केली आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीतील इतका पैसा भ्रष्टाचार आहे. याची पाळंमुळं खोदली पाहिजे, असं आरोप मिटकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या या आरोपानंतर आता राष्ट्रावादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे आता मुनगंटीवर यावर काय बोलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जेव्हा नारायण मूर्ती रतन टाटांच्या पाया पडतात

24व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; मोदी सरकारचा मो़ठा निर्णय

-सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही- अजित पवार

-धक्कादायक… स्वारगेटजवळच्या नाल्यात सापडलं अर्भक!

-इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला – जितेंद्र आव्हाड