“मोदी-शहा खुनी असल्याचे माझ्याकडे पुरावे”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खुनी असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असा गंभीर आरोप मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये संविधान बचाव सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोळसे पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाट याही उपस्थित होत्या.

मोदी आणि शाह हे खुनी असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. अमित शहा तडीपार गुंड आहेत. मोदी आणि शहांवर मास मर्डरचा गुन्हा आहे. याबाबत न्यायमूर्ती सावंत यांनी अहवालही दिला होता, असा आरोप कोळसे पाटील यांनी केला आहे.

आता आमचं सरकार सत्तेत आलं आहे. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत आणि हे सर्व पुरावे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिले आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“भष्ट्राचाराच्या पैशातून मुनगंटीवारांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला”

-जेव्हा नारायण मूर्ती रतन टाटांच्या पाया पडतात

24व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; मोदी सरकारचा मो़ठा निर्णय

-सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही- अजित पवार

-धक्कादायक… स्वारगेटजवळच्या नाल्यात सापडलं अर्भक!