काही बाही बोलून पंतप्रधान पदाचे महत्व घसरवू नका; राहुल गांधींचा मोदींना सल्ला…

नवी दिल्ली | काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची ईडी चौकशी आणि नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी काँग्रेसवर असलेली कारवाईची तलवार या विरोधात काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी आंदोलन केले होते.

यावेळी देशात काँग्रेसने (Indian National Congress) देशातील महागाई, बेकारी आणि एकदरींत खंगलेली अर्थव्यवस्था यावर सरकारला प्रश्न विचारण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलन केले होते.

त्यावर पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसचे नाव न घेता टीका केली होती. पानिपत येथील एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, काही लोक सध्या खूप नैराश्यात आहेत. नैराश्य दूर करण्यासाठी त्यांनी 5 ऑगस्ट रोजी काळी जादू केली.

काही लोकांना वाटते काळे कपडे घातल्याने आणि काळी जादू (Black Magic) केल्याने आपल्या समस्या आणि नैराश्य दूर होईल पण जादूटोना आणि काळी जादू यांसारख्या अंधश्रद्धेत गुंतून जनतेचा विश्वास मिळू शकत नाही, असे मोदी म्हणाले होते.

सध्या तुमचे वाईट दिवस सुरु आहेत, आणि काळी जादू करुन ते संपणार नाहीत, हे लक्षात असूद्या, असे पंतप्रधान म्हणाले होते. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाच्या (AAP) मोफत धोरणाचा देखील समाचार घेतला. जे सर्वकाही मोफत देण्याचे वचन देतात, त्यांना देशात तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी संसाधने कधीच सापडणार नाहीत, असे मोदी म्हणाले.

त्यावर आता राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी अधश्रद्धेशी संबंधित गोष्टीचा उल्लेख करुन पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करु नये, असे गांधी म्हणाले.

या संदर्भात राहुल गांधीनी एक ट्विट केले आहे. पंतप्रधानांना महागाई (Inflation) दिसत नाही, बेकारी (Unemployment) दिसत नाही. आपल्या काळ्या कामांना लपविण्यासाठी काळी जादू आदी अंधश्रद्धेला धार्जिणेे शब्द वापरुन पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी करु नये. देशाला मूळ मुद्यापासून भटकवणे बंद करा. जनतेच्या प्रश्नावर तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल, असे ट्विट गांधी यांनी केले.

महत्वाच्या बातम्या – 

विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीही नाराज; जयंत पाटील म्हणाले…

“ईडी कारवाई मागे लागलेल्या भावना गवळींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली”

आघाडीत बिघाडी?, महाविकास आघाडीबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

‘आरती करा त्या संजय राठोडाची’, पूजा चव्हाणची आजीची संतप्त टीका

‘कसला बोगस विनोद करताय?’, मोदींचा तो दावा नितीश कुमारांनी फेटाळला