अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका, म्हणाल्या…

पुणे | महाराष्ट्र शासनाने मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री परवानगी दिली, या धोरणाला सर्वच स्तरातून विरोध होताना दिसून येत आहे. आता या निर्णयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण अयोग्य आहे. वाईन ही दारूच आहे. दुकानात वाईन ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

वाईन ही दारूच आहे. वाईन सुपर मार्केटमध्ये ठेवणं अयोग्य आहे. लहान मूल, महिला नेहमी त्या ठिकाणी जातात. वाईन दुकानात ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

ऑफलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनावर देखील अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

राज्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या नेत्यांना महाराष्ट्रात काय चालले आहे, हे माहीत नसतं. कुठलाही विभाग घ्या सगळीकडे नुसती धांदल सुरू आहे, असं त्या म्हणाल्या.

विद्यार्थी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. ते केवळ मूठभर लोकांसाठी झटतात, असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला

महत्वाच्या बातम्या- 

‘…त्यामुळे आम्ही जनावरांसारखे बनतो’; शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य 

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना चिथावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक 

राज्यातील निर्बंधांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता… 

Budget 2022 | केंद्रीय अर्थमंत्री आज अर्थसंकल्प सादर करणार; अर्थव्यवस्थेला गती मिळणार? 

“राहुल गांधींचं पाकिट कुणी मारलं?”; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ