मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंन बीकेसी ग्राऊंडवर सभा घेत विरोधकांना चांगलंच फटकारलं होतं. त्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांकडून उत्तर मिळालं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी उत्तर सभा घेत ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. माझं वजन जास्त आहे बाबरी पडली त्यावेळी तर माझं वजन 128 किलो होतं, असं फडणवीस म्हणाले आहेत.
आता या वादात देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
वजनदार ने हल्के को बस हल्के से ही हल्का कर दिया, अशी टीका अमृता फडणवीसांनी ठाकरेंवर केली आहे. ठाकरेंच्या वजनावर वक्तव्य केल्यानं वाद देखील वाढण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंनी सभेत बोलताना फडणवीस यांनी फक्त पाय जरी ठेवला असता तरी बाबरी खाली आली असती, असा टोमणा फडणवीसांनी मारला होता.
दरम्यान, उद्धव ठाकरेंवर टीका करताना अमृता फडणवीसांनी देखील त्यांच्या वजनाचा उल्लेख केला आहे. राज्याचं राजकारण आता राजकीय वजनापेक्षा शारिरीक वजनावर जास्त चर्चिल जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण”
“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही”
“कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल
“मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”
Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज