मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. अशात आता वादात भर टाकणारा प्रकार पुण्यात घडला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या पुणे दौऱ्यावरून वाद होणार हे स्पष्ट होतं. पण काल राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसच्या महिला आघाडीकडून जोरदार विरोध करण्यात आला.
स्मृती ईराणी थांबलेल्या हाॅटेलबाहेर आणि कार्यक्रम स्थळाबाहेर दोन्ही जागी जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आलं. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
कार्यक्रम संपल्यानंतर ईराणींच्या गाडीवर अंडी फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रावादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते गृहमंत्री आपलाच आहे या भावनेत रोज कायदा हातात घेऊन बेकायदेशीर कृत्य करत आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सत्ता पक्षाचे कार्यकर्ते असं करू लागले तर राज्यात कायदा व सुव्यवस्था राहाणार नाही, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. आम्ही देखील जशास तसं उत्तर देऊ शकतो पण आमचा कायद्यावर विश्वास आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा देखील फडणवीस यांनी राज्य गृह विभागाला दिला आहे.
दरम्यान, स्मृती ईराणींना पुण्यात जोरदार विरोधाचा सामना करावा लागला परिणामी या घटनेचे पडसाद आता दिल्लीत देखील उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण”
“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही”
“कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल
“मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”
Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज