अमृता फडणवीसांचं नवीन गाणं सोशल मिडीयावर घालतंय धुमाकूळ; पहा व्हिडीओ

मुंबई |  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांंचा आवाज आणि त्यांनी गायलेल्या गाण्याचे अनेक चाहते आहेत. अमृता फडणवीसांची गाणी सोशल मीडियावर नेहमी धुमाकूळ घालत असतात.

अशातच आता अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. ‘ये नयन डरे डरे’ असे या गाण्याचे बोल आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हे गाणं रिलीज करण्यात आलं आहेे. अमृता फडणवीस यांनी स्वत: सोशल मीडीयावर हे गाणं शेअर केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी गायलेल्या या गाण्याचं दिग्दर्शन शक्ती हासिजा यांनी केलं आहे. या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांचा कूल अंदाज पहायला मिळत आहे. त्यांच्या इतर गाण्यांप्रमाणे हे गाणं हीट ठरणार का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

ये नयन डरे डरे या गाण्याचं मूळ गायण प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीन यांनी केलं आहे. या गाण्यात त्याने एका शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमृता फडणवीस यांनी लिओनेल रिचीनचं हे गाणं त्यांचं फेवरेट असल्याचं म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांचं व्हॅलेंटाईन डेच्या निमीत्ताने काही दिवसांपूर्वीच एक इंग्लिश गाणं रिलीज झालं आहे. त्यांनी आपल्या यु ट्युब चॅनॅलवर आणि ट्वीटरवर हे गाणं शेअर केलं होतं.

दरम्यान, काही महिण्यांपूर्वी अमृता फडणवीस यांचं ‘तिला जगू दया’ हे मराठी गाणे युट्यूबवर रिलीज झालं होतं. बहुतेक श्रोत्यांनी हे गाणं डीसलाईक केलं होतं. भाऊबिजीच्या दुसऱ्याच दिवशी रिलीज झालेल हे गाणे टी-सिरीज मराठीने लाँच केलं होतं.

महिला सक्षमीकरणावर हे गाणे आधारित आहे. परंतु लोकांना हे गाणे जास्त आवडलं नाही. या गाण्याला चाहत्यांनी लाईकही खुप कमी केलेल्या आहेत. या गाण्यावरून चांगलाच वा.द पे.टला होता.

काही वापरकर्त्यांनी या गाण्याची तुलना ढींचाक पूजाच्या गाण्यांशी केली होती. या गाण्याबद्दल लोक यूट्यूब आणि सोशल मीडियावरही वाईट प्रतिक्रिया देत होते. या गाण्यावरुन अनेक मीम्स देखील  सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

महत्वाच्या बातम्या –

गॅस सिलेंडर धारकांना आणखी एक झटका! सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ

अबब… तब्बल 10 हजार रूपयांनी स्वस्त झालं सोनं!

‘….म्हणून तिने आत्मह.त्या केली’; पूजाच्या वडिलांनी सांगितले आत्मह.त्येमागचं ध.क्कादायक कारण