अमृता फडणवीस यांचं ‘हे’ नवीन गाणं भेटीला

भाजप नेते व विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कायम आपल्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत असतात. विरोधी पक्षावर कायम टिका करत असतात. मात्र त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात.

अमृता फडणवीस यांना गायनाची आवड आहे. त्यांच्या या आवडीमुळे त्या नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात. मात्र त्यांच्या गायनाच्या शैलीमुळे त्यांना कायम टिकेला तोंड द्यावं लागतं. आता नुकतचं जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी आपलं नवीन गीत प्रेक्षकांच्या भेटीस आणलं आहे.

अमृता फडणवीस यांचं नवं गीत हे नाट्य संगीतावर आधारीत असुन, “भावनांच्या खेळामध्ये गडगडले मी गडबडले मी…गडगडले मी गडबडले, कुनी म्हणाले वेडी कुठली,कुनी म्हणाले खुळी…कुनी म्हणाले या जगतातील हिचं लुळी पांगळी” असे या गाण्याचे बोल असून, महिला दिनी खास तुमच्यासाठी सादर करत आहे. अशी माहीती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

दरम्यान, त्याचं हे नवं गीत स्त्री- शक्तीला गौरवणारे आहे. स्त्रीला कोनी वेडे ठरवते तर कोनी खुळे ठरवते,मात्र संघर्ष पथावर निघालेल्या स्त्रिच्या प्रगतीचा प्रवाह कोनी अडवू शकत नाही. त्यामुळे हे गीत नक्की पहा असे ट्विट त्यांनी या आधीचं केलं होते.

महिला दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी स्त्री सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. एकीकडे स्त्री-सुरक्षितता, स्त्री-सशक्तीकरण या मुद्दयांवर सगळेचं बोलताना दिसतात, मात्र याच तुलनेत स्त्रियांवर होणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. स्त्रियांच्या सुरक्षिततेवर फक्त बोलून उपयोग नाही तर त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

आपल्या येथील महिला अजुनही सुरक्षित नाहीत. स्त्रियांवर होणारे बलात्काराचे प्रमाण वाढतचं चालले आहे. स्त्रियांना केले जाणारे ट्रोलींगचे प्रमान तसेच स्त्रियांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे वाढले आहे. या बाबतीत अमृता फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरवर्षी महिला दिन सगळे आनंदानं साजरा करतात. या दिवशी सगळ्यांच्या मनात महिलांबद्दल आदर असतो, आत्मियता असते. मात्र स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न आजही तसाच आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

‘मेसेजवरुन धमक्या कसल्या देताय दम असेल तर समोर या’, धमक्या देणाऱ्याला अभिनेत्रीचं आव्हान

दहावी, बारावीच्या 50 हजारांहून अधिक विद्यार्थांचा ऑफलाईन परीक्षेला नकार…..

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

जसप्रीत बुमराह लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ ठिकाणी करणार लग्न

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण?; रणधीर कपूर यांनी केला खुलासा, म्हणाले…