देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांना दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…

मुंबई | ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात मिसेस अमृता फडणवीसांनी अनेक धमाल किस्से सांगून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. देवेंद्र फडणवीसही यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पती देवेंद्र फडणवीसांच्या हातचा आवडता पदार्थ कोणता, हा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारल्यानंतर आधी दरवेळेस जेव्हा आमची बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून मी आवर्जून डोसे बनवून घ्यायचे, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं.

कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही अमृता वहिनींना कोणता सल्ला द्याल, असं देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं. तेव्हा तिथे गेल्यावर जे काय पदार्थ तू बनवणार आहेस, त्यासोबत नवनवीन पदार्थ शिकता आले तर शिक आणि ते बनव आणि मला खाण्यापासून रोखू नकोस, असं ते म्हणाले.

खाण्यातली मजा ही जीवनातल्या एका मोठ्या आनंदासारखी आहे. हा आनंद मला सतत मिळत राहायला पाहिजे, याची कृपया काळजी घे, असं उत्तर फडणवीसांनी दिलं.

एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. तर लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर मिसेस फडणवीस यांनी दिलं आहे.

देवेंद्रजी तुम्हाला कोणता पदार्थ उत्तम करता येतो, असा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारला. त्यावर मला चहा, डोसा, अंडा करी, ऑम्लेट, पोहे असे अनेक पदार्थ चांगले बनवता येतात, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

“बायको हट्टाला पेटली तर नवऱ्याने 3 दिवस तिच्यासोबत झोपू नये अन्…” 

“आता सेलिब्रिटींचे कपडे उतरतील ते सुद्धा सगळ्यांसमोर” 

“चंद्रकांतदादा बेगाने शादी में नाचू नका, नाही तर तुमचेही कपडे फाटतील” 

“भाजपला दूध दिसत नाही शेण दिसतं, त्यांचा दृष्टिकोनच तसा आहे” 

पोस्ट ऑफिस विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती; मिळणार भलामोठ्ठा पगार