तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. भारतीय वाहान बाजार हा जगातील प्रमुख वाहन बाजार आहे. या बाजाराला देखील कोरोना काळाचा प्रचंड फटका बसला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होत आहे तसतसं भारतीय वाहन बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. अशातच आता मारूती कंपनी आपल्या कास फिचरच्या नवीन माॅडेलला लाॅन्च करणार आहे.

मारूती कंपनीची प्रसिद्ध हैचबैक गाडी वैगन आर ही लवकरच आपल्या नव्या स्वरूपात ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या माॅडेलमध्ये अधिक आकर्षक पद्धतीनं अनेक बदल करण्यात आले आहेत.

वैगन आर ही माॅडेल भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे. या गाडीनं आपल्या पहिल्या माॅडेलची विक्रमी विक्री नोंदवली होती. परिणामी आता ग्राहक नव्या स्वरूपात येत असलेल्या वैगन आरची प्रतिक्षा करत आहेत.

5.18-6.58 लाख अशी वेगवेगळ्या व्हेरियंटची किंमत आहे. ग्राहक आपल्या पसंतीनूसार त्या किंमतीची वैगन आर गाडी खरेदी करू शकतात. ही गाडी वेगवेगळ्या 14 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

डिझेल आणि पेट्रोल अशा दोन इंजिन ऑप्शनमध्ये ही गाडी मिळणार आहे. तसेच वैगन आरचा सीएनजी माॅडेल देखील भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आहे.

वैगन आर फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवीन बलेनोमध्ये नवीन 9-इंचाची डिजिटल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली दिसण्याची अपेक्षा आहे. अपहोल्स्ट्री लाँच केल्यावर अंतर्गत वैशिष्ट्यांसह इतर बदलांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, वैगन आर या कारच्या नव्या माॅडेलची भारतीय बाजारात खूप उत्सूकता पाहायला मिळत आहे. परिणामी मारूती सुझूकी कंपनीकडून लवकरच ही कार बाजारात उतरवली जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल, तेव्हा…”

“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”

अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!