आज मध्यरात्रीपासून ‘या’ जिल्ह्यात 11 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर

नांदेड | गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. तरीदेखील कोरोना आटोक्यात येत नाहीय.

याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 25 मार्च ते 4 एप्रिल रोजीपर्यंत म्हणजेच अकरा दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. नांदेड जिल्ह्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं आहे.

या लॉकडाऊन काळात महाविद्यालये, कॉचिंग क्लासेस, लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे, आठवडी बाजार, सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल्स, बार, सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने, चित्रपटगृह मॉल्स, दुकाने, पार्लर, सलून, बाहेर फिरणे या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.

केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. त्यामध्ये मेडिकल, रुग्णालय, खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पॅट्रोल पंप, गॅस पंप यांचा समावेश असणार आहे. ह्या गोष्टी चोवीस तास सुरु राहणार आहेत.

सकाळी 7 ते 12 यादरम्यान किराणा दुकाने सुरु ठेवता येणार आहे. त्याचबरोबर दूध विक्री, वर्तमानपत्र, पाणी पुरवठा, फळ आणि भाजीपाला विक्रि सकाळी ते 10 या कालावधीमध्ये सुरु असणार आहे.

जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती, असं आवाहनही प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 36 हजारांवर गेला आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोना रुग्णासंख्या 9 हाजारांनी वाढली आहे. काल दिवसभरात कोरोनाबाधितांचा आकाडा 1 हजार 30होता.

महत्वाच्या बातम्या-

थॉयरॉईडमुळं वजन वाढतंय, मग घ्या ‘ही’ काळजी

“काही झालं तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे…

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी मागितली…

जाणून घ्या! कांद्याच्या सालीचे ‘हे’ आरोग्यदायी…

‘या’ अभिनेत्रीनं केली होती कंडोमची पहिली…