मोदींच्या सुरक्षेत त्रुटी अन् कंगना पंजाबवर भडकली, म्हणाली…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood actress Kangana Ranaut) नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. कंगना नेहमी भाजप समर्थक भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात येतो.

मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगनाने जहरी टीका केली होती. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तिने खालिस्तानी (Khalistani) म्हटलं होतं. त्यावेळी कंगनाचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.

अशातच आता काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी झाली होती. यावर आता कंगना राणावतने पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

पंजाबमध्ये जे घडलं ते लज्जास्पद असल्याचं कंगना रणौतने म्हटलं आहे. आदरणीय पंतप्रधान हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते आहेत. प्रतिनिधी आणि 140 कोटी जनतेचा ते आवाज आहेत, असं कंगना म्हणाली.

त्यांच्यावर असा हल्ला म्हणजे देशातल्या प्रत्येक नागरिकावर हल्ला आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे, असंही कंगना रणौत म्हणाली आहे.

पंजाब हे दहशतवादी कारवायांचं केंद्र बनत चाललं आहे. आता आपण हे थांबवलं नाही तर देशाचं मोठं नुकसान होऊ शकतं, असं वक्तव्य कंगनाने केलं आहे.

आपल्या इन्सट्राग्राम अकाऊंटवर कंगनाने स्टोरी लिहीली होती. त्यात तिने हे वक्तव्य केलं आहे. त्यावेळी तिने  #BharatStandWithModiji असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मुलगा हट्टाला पेटला अन् बापाचं नशीब बदललं, रातोरात मालामाल

“जगाची चुकीची बाजू वर…”, अमृता फडणवीस यांचं नवं ट्विट चर्चेत

राज ठाकरेंना मोठा धक्का! न्यायालयाकडून अजामीनपात्र वाॅरंट जारी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

भीषण दुर्घटना! ‘या’ ठिकाणी गॅस गळतीमुळे 6 जणांचा मृत्यू