Russia-Ukraine War | झेलेन्स्की यांचा नाटो देशांना अत्यंत गंभीर इशारा, म्हणाले…

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन आता तब्बल 17 दिवस झाले आहेत. पण अद्यापही कोणता तोडगा काढण्यात जगातील देशांना यश आलेलं नाही.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोणत्याही परिस्थितीत युक्रेनवर ताबा मिळवण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले आहेत.

पुतिन यांच्या आदेशानंतरही रशियन सैन्याला युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवता येत नाही. अशातच रशियानं युक्रेनवर मिसाईलनं हल्ला केला आहे.

रशियन सैन्यानं मोठ्या तयारीनं युक्रेनवर हल्ला करत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाच्या मिसाईल हल्ल्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वेळ आहे तोपर्यंतच नाटो देशांनी एकत्र येण्याची गरज आहे कारण रशिया कोणत्याही क्षणी नाटो सदस्य देशांवर मिसाईलनं हल्ला करू शकतो, असं झेलेन्स्की म्हणाले आहेत.

रशियन मिसाईल युक्रेनच्या सैन्यस्थळांना लक्ष्य करत आहे. नाटो देशांच्या लगतच्या परिसरात असलेल्या स्थळांना निशाणा करण्यात येत आहे.

नाटो देशांनी लवकरात लवकर आपली हवाई हद्द बंद करावी, अशी विनवणी देखील झेलेन्स्की यांनी केली आहे. रशियन सैन्यानं युक्रेन सैन्य दलाच्या प्रमुख स्थळांवर हल्ले केले आहेत.

दरम्यान, झेलेन्स्की यांच्या आवाहनानंतर नाटो देश काय निर्णय घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी रशिया माघार घेण्याचा मनस्थितीत दिसत नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या – 

 सोन्या-चांदीच्या दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

 “नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील आणि…”

Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे आता फक्त 14 दिवसांचा… 

महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन! 

“ज्यांना वाटतं की ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट योग्य नाही त्यांनी…”