आनंद महिंद्रा यांनी लसीकरणासंदर्भात नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई |  मागिल काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे.

अशातच प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी करोना लसीकरणासंदर्भात एक मागणी केली आहे. महाराष्ट्रात सरसकट कोरोना लसीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी केली आहे.

यासंदर्भात आनंद महिंद्र यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्र हे राज्य अर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे सध्याची करोनाची परिस्थिती बघता महाराष्ट्र पुरतं तरी सरकट लसीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी, असं लिहिलं आहे.

रोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र राज्य हे अर्थिक क्षेत्राच्या केंद्रस्थानी असल्यानं पुन्हा लॉकडॉऊन करणं हे महाराष्ट्र राज्याला अर्थिक दृष्ट्या कमकुवत करणारे ठरेल.

त्यामुळे ज्यांना-ज्यांना लस घेण्याची इच्छा आहे, अशा सर्व नागरिकांना लसीकरण करण्याची तातडीने परवानगी देण्याची गरज असल्याचंही, आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याकडे लसींची कमतरता नसल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच  या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना टॅग देखील केलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांना काही निर्बंध घालून दिले होते. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्यामुळे सरकारने सरसकट टाळेबाजी करण्याऐवजी हे निर्बंध 31 मार्चपर्यंत लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे स्वयंशिस्त पाळा, अन्यथा टाळेबंदी करु, असा सूचक इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘पुढील पाच वर्षात देणार एक लाख लोकांना नोकऱ्या,’ ‘या’ अभिनेत्यानं केली मोठी घोषणा

राज्यात पुढील काही दिवस हवामान खात्याकडून ‘या’ भागात पावसाचा इशारा

‘महाराष्ट्राने संयम सोडला तर…’; शिवसेनेचा आक्रमक इशारा

करिअरच्या उंच शिखरावर असताना ‘या’ कारणामुळे झाला होता इंडस्ट्रीतून गायब, जाणून घ्या हनी सिंगच्या खडतर प्रवासाबद्दल

‘या’ भाजप नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश