कोरोना व्हायरस जगाला ‘या’ 4 गोष्टी शिकवणार; आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

मुंबई |   कोरोना व्हायरसने जगभरात हातपाय सपरायला सुरूवात केली आहे. कोरोनाचे भारतात देखील 28 रूग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. मात्र कोरोना व्हायरसचं संकट कधीतरी निघून जाईल पण या रोगामुळे आणि आजारामुळे आपल्याला 4 गोष्टी शिकता येतील, असं मतं उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मांडलं आहे.

कोरोना व्हायरस आपल्याला अनेक गोष्टी शिकवणार आहे. यामध्ये कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची मुभा देतील. डिजीटल परिषदेचे प्रमाण वाढेल, कंपनीच्या मिटिंग्ज ऐवजी व्हीडिओ कॉलवरून मिटींग्ज होतील आणि विमान वाहतुकीच्या प्रमाणात घट होईल, या गोष्टी आपल्याला शिकता येतील, असं आनंद महिंद्रा ट्वीट करून म्हणाले आहेत.

कोरोना व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. आता कोरोनाचा विळखा जगभर पसरत असल्याचं दिसत आहे. भारतात देखील काही कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणची सरकारं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोनाची लागण टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन न करण्याचं आवाहन केलं आहे. यंदा होळीच्या कार्यक्रमात हजेरी लावणार नसल्याचं मोदींनी सांगितलं आहे.

 

Anand mahindra Tweet

 

महत्त्वाच्या बातम्या-

-कोरोना नष्ट करण्यासाठी ‘जय श्री रामा’चा जयघोष करा; महंत परमहंस यांचा अजब दावा

-मनात सतत शारिरीक संबंधाचे विचार येणं ही समस्या?

-हे सरकार नक्की चालवतंय कोण?? मुस्लिम आरक्षणावरून भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

-“कोण अमृता फडणवीस? त्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

-“अहो, तुम्ही सत्तेसाठी किती हापापलेले आहात हे मध्य प्रदेशच्या ऑपरेशन लोटसवरून दिसून आलं”