मुंबई | कठोर परिश्रम जेव्हा मनापासून केले जातात तेव्हा यश तुमच्या पायाशी लोळण घेत असते, अशीच काहीशी गत ‘जोधपूर का छोरा’ रवी बिश्नोई याची झाली आहे.
क्रिकेटच्या वेडापायी चक्क बोर्डाच्या परीक्षेला दांडी मारणाऱ्या रवीला त्याच्या त्यागाचं आणि कष्टाचं फळ मिळाले असून, राष्ट्रीय क्रिकेट संघाचे द्वार त्याच्यासाठी उघडण्यात आले आहे.
कोच शाहरूख खान पठाण याने त्याला फिरकी गोलंदाज होण्याचा सल्ला दिला. नुसता सल्लाच दिला नाही तर त्याला तसं घडविलंही.
त्याची गोलंदाजी पाहून राजस्थान रॉयल्समध्ये त्याला नेट गोलंदाज म्हणून बोलाविण्यात आलं. अंडर-19 वर्ल्डकपसाठी निवड झाली आणि ती त्याने सार्थ करून दाखविली.
स्पर्धेत संघाला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात निर्णायक भूमिका पार पाडली आणि त्याने सर्वाधिक विकेट देखील मिळविल्या. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनंतर माजी कर्णधार आणि लेग स्पिनर अनिल कुंबळेने दोन कोटी रुपयांना बिश्नोईला पंजाब संघात स्थान दिलं होतं.
2022 मध्ये नवीन हंगामात तो पुन्हा एकदा कर्णधार के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाकडून खेळेल. जोधपूरच्या बिरामी गावचे रहिवासी असलेले रवीचे वडील मांगीलाल शिक्षक आहेत, तर आई शिवरी देवी गृहिणी आहे.
बिश्नोई दिवसभर क्रिकेट खेळत असे वडील घरी यायची वेळी अभ्यासाला बसायचा. तो गावातील शेतात क्रिकेट खेळायचा आणि जोधपूरमध्ये आल्यावर गल्लीत खेळायचा. नंतर त्याने प्रद्धुत सिंह यांच्या स्पोर्टस् कॅडमीमध्ये प्रवेश घेतला.
त्यामुळे त्याचा खेळ सुधारला व तो ‘लेग स्पिनर’ म्हणून नावारूपाला आला. पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन मालिकांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
पाॅर्नस्टार मिया खलिफाचा मोठा खुलासा, म्हणाली “पॉर्न फिल्म शूट करताना…”
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार
“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा