मुंबई | राज्यातील सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये वाईनची विक्री करण्यास ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाने परवानगी दिली आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
किराणा दुकानात वाईन विक्री केली जाणार असल्याने आता भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. भाजप नेत्यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधल्याचं पहायला मिळतंय.
वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
काही देश पाण्याऐवजी वाईन पितात. काही देशांनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र म्हणून स्वत:ला घोषित केलं असल्याची देखील अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, आपण दारू नाही, तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यावर आता विरोधपक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
महत्वाच्या बातम्या –
पाॅर्नस्टार मिया खलिफाचा मोठा खुलासा, म्हणाली “पॉर्न फिल्म शूट करताना…”
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार
“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा