अग्निवीरांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजप देणार नोकरी, ‘या’ नेत्याची मोठी घोषणा

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये बोलताना अग्निपथ योजनेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अग्निवीरांना भाजप कार्यालयाचं सुरक्षारक्षक निवडताना प्राधान्य देऊ, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

कैलाश विजयवर्गीय यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेस, आम आदमी पक्षानं भाजप आणि विजयवर्गीय यांच्यावर टीका केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत देशाचा आणि विद्यार्थ्यांचा अपमान करुन नका असं म्हटलं आहे. आपल्या देशातील युवक दिवस रात्र मेहनत करतात, शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात कारण त्यांना सैन्य दलात जाऊन आयुष्यभर देशसेवा करायची असते. भाजपच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षक होण्यासाठी ते मेहनत करत नाहीत, असं अरविंद केजरीवाल म्हणालेत.

कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी अग्निपथ योजनेसंदर्भातील सगळ्या शंका दूर केल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

कैलाश विजयवर्गीय वादग्रस्त वक्तव्यामुळं यापूर्वी देखील चर्चेत आले होते. कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

दरम्यान, केंद्र सरकारनं भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली आहे. अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर भारतातील आठ राज्यांमध्ये मोठा विरोध करण्यात आला. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, तेलंगाणामध्ये या योजनेला तरुणांनी मोठा विरोध केल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘त्या मावळ्याचा बळी जाणार’; भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण 

3 आमदारांनी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली?; महत्त्वाची माहिती समोर  

“मी जिंकलोय याची आजच खात्री देतो, संध्याकाळी मुलाखत देईन” 

“मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय मला फरक पडत नाही, कारण…” 

‘पक्षादेश पाळणं आमच्या रक्तातच’; आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना