“काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आल्यास झोडून काढू”

अमरावती | काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास त्यांना झोडून काढू, असा घणाघात भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माफी मागण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मोदींनी माफी न मागितल्यास काँग्रेस कार्यकर्ते भाजपच्या राज्यभरातील कार्यालयांवर आंदोलन करण्याचा इशारा पटोलेंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याला अनिल बोंडेंनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

नाना पटोले यांनी आज म्हटलं की, महाराष्ट्रात सगळ्या भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार. भाजपने माफी मागावी म्हणून. खरंतर याच लोकांनी छत्रपती शिवाजी माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रमध्ये कोरोनाच्या काळात ते कोणाच्याच कामाला आले नाहीत. मुख्यमंत्री फिरकले नाहीत, नाना पटोले फिरले नाही असं अनिल बोडेंनी म्हटलं.

लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून जर हा गमजा करत असेल आणि उद्या काँग्रेसचं एक काळं कुत्रं जरी भाजपच्या कार्यालयावर आलं तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही. हे नाना पटोलेंनी लक्षात ठेवावं, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये समजत आहे.

नाना पटोले यांचे काँग्रेसचे कार्यकर्ते उद्या किती वाजता भाजपच्या कार्यालयासमोर येत आहेत ते त्यांनी सांगावं. आमचे सगळे कार्यकर्ते तयार राहतील, असं त्यांनी म्हटलंय.

कोरोनाच्या काळात दारुचा टॅक्स कमी करतात. दारुच्या दुकानजदाराला लायसन्सची फी कमी करतात. आणि कोरोना संपण्याच्या आधीच वाईन किराणा दुकाणात आणतात. माफी यांनी मागायला हवी आणि ते आम्हाला शहाणपणा शिकवतात. ते आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या – 

तीन दिवस शाळा-काॅलेज बंद; हिजाब वादानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय 

लता मंगेशकर यांचं इंग्रजी गाणं ऐकलं का?, महेश काळेंनी शेअर केला व्हिडीओ

 “अजित पवारांनी धरणाची जागा देखील शिल्लक ठेवली नाही”

 “मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिल्यास ‘या’ शहरात लतादीदींचं भव्य स्मारक उभारू”

 “नाना तुम्हाला एवढंही सांगतोय, अंगावर आला तर शिंगावर घेऊ”