“केंद्राचा ‘हा’ निर्णय घटनाबाह्य; केंद्र सरकारला कोणाला तरी वाचवायचंय”

मुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेच्या मूळाशी आम्ही जात होतो. कोणत्याही निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यात येऊ नये या दिशेने आम्ही तपास करत होतो. मात्र या प्रकरणाचा  तपास राज्य शासनाला न सांगता एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकार कोणाला तरी वाचवत असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

राज्य शासनाशी कोणताही संवाद न साधता हा तपास एनआयएकडे देण्यात केला. केंद्राचा हा निर्णय घटनाबाह्य आहे. आम्ही याप्रकरणी कायदेशील सल्ला घेऊन पुढील पावलं उचलू, असंही देशमुख यांनी सांगिलतलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागणीनुसार भीमा –  कोरेगाव हिंसाचाराची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकताच केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे देत महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी केली आहे.

दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीत भीमा कोरेगाव तपासावरून आरोप प्रत्यारोप होणार हे निश्चित असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने महाविकास आघाडीला झटका दिला.

महत्वाच्या बातम्या-