दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का?; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

चंद्रपूर | कोरोनाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दाऊदच्या मृत्यूबाबत प्रश्न विचारण्यात आला मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं.

तुम्ही थेट कराचीत पोहोचलात, आधी चंद्रपूरचं बघूया, असं अनिल देशमुख म्हणाले. अनिल देशमुख यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज चंद्रपुरात एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानच्या कराची शहरात कोरोनाने मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. अनेकजण याबाबतचे अंदाज वर्तवत आहेत. मात्र सरकारने याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.

दाऊद  सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याचा दावा केला जातो. भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर परवडणाऱ्या दरात आणि अखंडित वीजपुरवठा होईल- उद्धव ठाकरे

-आईचा चिमुकलीला दम; उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांना का त्रास देताय?

-उद्धव ठाकरेंचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश… फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

-लॉकडाऊन काळात भुजबळांचं खातं ‘अ‌ॅक्टीव्ह’, अन्न नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात विक्रम

-कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार