Top news मनोरंजन

“सुशांत सिंह राजपूतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती?”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय याप्रकरणी तपास करत आहे. मात्र, अद्याप सुशांतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती, हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून देशातील वातावरण चांगलंच तापलं होतं. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला सुशांत प्रकरणी तपास सुरु केला होता. मात्र, काही दिवसांनी सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये दाखल केलेल्या तक्रारी नुसार बिहार पोलिसांनीही याप्रकरणी शोध सुरु केला होता. यानंतर सुशांत प्रकरणावरून बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं होतं.

बिहार आणि मुंबई पोलिसांच्यात चाललेला हा वाद सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेला होता. यांनतर सर्वोच्च न्यायलयानं सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपविलं होतं. मात्र, अद्याप सीबीआय सुशांत प्रकरणातील गुंता सोडवू शकली नाही. या मुद्द्यावरूनच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सीबीआयवर निशाणा साधला आहे.

सुशांत सिंह राजपूतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती? सुशांत प्रकरणी मुंबई पोलीस उत्तमरित्या तपास करत होती. मात्र अचानक मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घेत सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयनं आता सुशांत प्रकरणातील सत्य लवकरात लवकर सर्वांसमोर आणलं पाहिजे, असं म्हणत अनिल देशमुख यांनी सीबीआयवर निशाणा साधला आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून लोक सुशांत प्रकरणातील निकालाची वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप सीबीआय याप्रकरणी तपास करू शकली नाही, असंही अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच सध्या सुशांत प्रकरणी सुशांतचा जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानी सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

सुशांत प्रकरणी सिद्धार्थ पिठानी महत्वाचा साक्षीदार आहे. मात्र सिद्धार्थ आपले जबाब वारंवार बदलतोय हे सीबीआयच्या लक्षात आल्यानं कलम 164 नुसार 4 ऑक्टोबरला सिद्धार्थची साक्ष घेतली जाणार आहे. 4 ऑक्टोबरला सिद्धार्थनं दिलेली साक्ष ही अंतिम साक्ष मानण्यात येणार आहे. काही साक्षीदारांच्या उपस्थितीत सिद्धार्थची साक्ष लिहून घेतली जाणार आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमध्ये सीबीआयला अं.म.ली पदार्थांचा उल्लेख आढळला होता. यानंतर एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेत अं.म.ली पदार्थ प्रकरणी शोध सुरू केला होता. रियाच्या अ.टकेनंतर याप्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. तसेच काही ड्र.ग्ज पेड.लर्सलाही एनसीबीनं ता.ब्यात घेतलं आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर आणि सारा अली खान यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. शनिवारी एनसीबीनं सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोन यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं होतं.

तसेच अभिनेता शाहरुख खान, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर आणि डिनो मोरिया या बड्या कलाकारांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी या बड्या कलाकारांची नावे समोर आल्यानं इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी कलम 302 लागणार? ‘या’ कारणानं सिद्धार्थ पिठानी सीबीआयच्या रडारवर

…अन् तीन दिवस रतन टाटा ताज हॉटेलच्या बाहेर पादचारी मार्गावरच थांबले होते

अभिनेता सोनू सूद आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘या’ प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित!

‘अनुराग कश्यप पोलिसांना खोटं बोलत आहे’; अनुरागच्या ‘त्या’ स्टेटमेंटवर पायल घोष भडकली

सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन यांची घोषणा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!