मुंबई | परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता. यानंतर यावर प्रतिक्रिया देत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.
ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केलेली. यावर प्रत्युत्तर देत अनिल परबांनी सोमय्यांना सुनावलं आहे.
बॅग भरून तुरुंगात जायला ही काय सहल आहे नाही, असा टोला लगावला. ते लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
किरीट सोमय्यांकडून बदनामी करण्याचं काम होतंय. खोटी कागदपत्रे दाखवली जात आहेत, त्यावरून भ्रम तयार केला जात आहे आणि सगळे भ्रष्ट आहेत असं दाखवलं जातंय, असा आरोप अनिल परबांनी केला आहे.
बॅग भरून जेलमध्ये जायला ही काही ट्रीप नसते. कुणीही बॅग भरून जेलमध्ये ट्रीपला जात नाही. मी गुन्हेगार असेन, माझ्यावरील गुन्हे सिद्ध झाले तर मला जी शिक्षा देण्यात येईल ती मला मान्य करावीच लागेल. मात्र, मी गुन्हेगार नसेन आणि तरीही कुणी आरोप करत असेल तर त्याची उत्तरं त्यांनाही द्यावी लागतील, असं परब म्हणाले.
ज्याच्यावर विक्रांतचे पैसे खाल्ल्याचा आरोप आहे त्या व्यक्तीने दुसऱ्यांवर असे आरोप करणं हास्यास्पद आहे, अशीही टीका अनिल परब यांनी सोमय्यांवर केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
“…अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल”
पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान
“शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता घरी बसावं”
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवं वळण; पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ
“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो”