“…अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल”

पुणे | शरद पवार आणि रोहित पवार यांचा चौडीत यांचा संबंध काय? महत्वाचं म्हणजे शरद पवारांचं आता वय झालंय, त्यांनी घरी बसावं, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमध्ये केली आहे.

कांदा परिषदेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण झालाय. पडळकरांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत. अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल. ते सतत शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर तोंडसुख घेत असतात. भाजप नेते स्वत:ला सुसंस्कृत समजतात पण त्याच लोकांच्या या भावना आहेत, असं म्हणत रूपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपचे नेते ते बोलू शकत नाहीत, म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात, असंही रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्यात.

भाजपाने महादेव जाणकरांचा देखील उपयोग करून घेतला, तेही पडळकरांप्रमाणे शरद पवारांवर टीका करत होते. पण ते वेळीच शहाणे झाले आणि त्यातून बाहेर पडले. पण भाजपाला सतत शरद पवारांना लक्ष्य करायचं असतं, असं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान 

“शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता घरी बसावं”

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवं वळण; पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ 

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो”

‘लाथ घातल्यानंतर…; शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली!