दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे शेवटचा पर्याय काय? अनिल परब म्हणाले…

मुंबई | शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे सर्व आमदार दसरा मेळावा घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहेत.

दोनही गंटात दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी चढाओढ सुरु आहे. विशेष म्हणजे दोनही गटांनी दसरा मेळावा घेण्यासाठी महानगरपालिकेला अर्ज केला आहे.

महापालिकेने (BMC) कायदा आणि सुव्यवस्था हे मुद्दे पुढे करत दोनही गटांना शिवाजी पार्क मैदान नाकरले आहे. शिवसेेनेने आता त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे.

त्यामुळे दरवर्षीची परंपरा असलेल्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात यंदा खंड पडणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमक असलेली शिवसेना आता काय करणार, कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेची पुढील रणनीती काय? शिवसेना आगामी काळात आंदोलने, निदर्शने यांच्या मार्गातून रस्त्यावरील लढाई केली जाणार आहे का, याबद्दल आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी भाष्य केले आहे.

शिवसेनेच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरु आहे, त्यामुळे आमची पुढील भूमिका न्यायालयाच्या निर्णयानंतर ठरणार आहे, असे अनिल परब म्हणाले. खरी शिवसेना कोण, हे ठरविण्याचा अधिकार शिंदे गटाला नाही, असे देखील परब म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

मोहन भागवतांनी दिल्लीत मशिदीला दिली भेट; देशभरात चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप; मविआने मला गेली अडीच वर्षे

दसरा मेळाव्याबाबत मोठी बातमी; शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याला..

भाजपच्या मिशन ‘मुंबई’मध्ये आता पंतप्राधान मोदी उतरले

‘भाजपचा एकनाथ शिंदे गटाला दणका’