नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी एका मुस्लिम नेत्याची भेट घेतली.
भागवतांच्या या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. मोहन भागवतांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे (All India Imam Organisation) उमर अहमद इलयासी (Umar Ahmed Ilyasi) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
यावेळी त्यांच्यात एक तास चर्चा चालली होती. त्यामुळे बंद दाराआड झालेल्या या चर्चेत नेमके काय घडले आणि काय बोलणे झाले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
सदर भेटीमुळे देशभरात एक चांगला संदेश गेला आहे. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे चर्चा केली. आमच्या आमंत्रणाचा मान ठेवत मोहन भागवत आल्याने आम्हाला बरे वाटले, अशी प्रतिक्रिया उमर इलयासींचा मुलगा सुहैब इलयासी यांनी दिली.
मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या मशिदीला भेट दिली. या भेटीबाबत संघाने आपले मत व्यक्त केले आहे.
देशातील धार्मिक सौहार्द वाढविण्यासाठी मुस्लीम बुद्धीजीवींना भागवत भेटत असल्याचे संघाने म्हंटले आहे. संघचालक अनेक लोकांना भेटत आहेत, हा सातत्यपूर्ण संवाद प्रक्रियेचा भाग असल्याचे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर (Sunil Ambekar) म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप; मविआने मला गेली अडीच वर्षे
भाजपच्या मिशन ‘मुंबई’मध्ये आता पंतप्राधान मोदी उतरले
दसरा मेळाव्याबाबत मोठी बातमी; शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याला..
‘भाजपचा एकनाथ शिंदे गटाला दणका’
“हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देखील आमदार नाही” वक्तव्यावर मनसेचे शरद पवारांना सडेतोड उत्तर