मुंबई | काँग्रेसमध्ये सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा गोंधळ आहे. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील व्यक्ती अध्यक्ष होणार नाही आणि निवडणुकांत सहभाग देखील घेणार नाही.
काँग्रेसचे अध्यक्षपद भुषविण्यासाठी अनेक दिग्गज उत्सुक आहेत. यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांचा सामावेश आहे.
मात्र आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या एका वक्तव्यामुळे अशोक गहलोत या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण राहुल गांधी यांनी ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमाशी सहमत आहोत, असे म्हंटले आहे.
त्यामुळे आता अशोक गहलोत यांना अध्यक्षपद भुषवायचे असेल, तर त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण राहुल गांधी यांनी त्यांच्या उमेदवारीबद्दल स्पष्ट वक्तव्य केले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबाची 71 वर्षीय गहलोत यांना पसंती आहे. पण अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा नाही आहे, अश्या प्रकारची वृत्ते आहेत.
जर का अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडले तर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट (Sachin Pilot) मुख्यमंत्री होतील, अशी त्यांना भिती आहे. 2020 साली पायलट यांनी समर्थक आमदारांसोबत बंड करत सरकार पाडले होते.
त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्याने अशोक गहलोत यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता काँग्रेच्या निवडणुकीत कोण पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या –
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे शेवटचा पर्याय काय? अनिल परब म्हणाले…
मोहन भागवतांनी दिल्लीत मशिदीला दिली भेट; देशभरात चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप; मविआने मला गेली अडीच वर्षे
भाजपच्या मिशन ‘मुंबई’मध्ये आता पंतप्राधान मोदी उतरले
दसरा मेळाव्याबाबत मोठी बातमी; शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याला..