“माफियागिरी दाऊदगिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही”

मुंबई | अनिल परब (Anil Parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अधिकच आक्रमक झाले आहेत. हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांमी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

अनिल परबला आज ना उद्या मंत्रीमंडळातून बाहेर काढावं लागणार आहे. दोन्ही अनिल परबांचे रिसोर्ट आहेत. मग एकावरच कारवाई आणि दुसऱ्यावर का नाही? असा सवाल सोमय्या यांनी केला.

हे अनधिकृत बांधकामं तोडावं लागणार आहे. ठाकरे पोलिसांना नाचवतात पण पोलीस जनतेचे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे माफिया आणि वसुलीवाले आहेत, असं सोमय्या म्हणालेत.

मी पुरावे दिलेत आणि मलाच जेलमध्ये टाकू म्हणतात. नवाब मलिक गेलेत, मात्र डर्टी डझनवर अजून कारवाई होणार आहे. चोरी लबाडी पकडली तर हे असं वागतात. हे चालू देणार नाही. माफियागिरी दाऊदगिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे.

दरम्यान, आज सकाळीच किरीट सोमय्या यांच्या घराखाली 40 ते 50 गाड्यांची रांग लागली होती. यावेळी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली.

सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या घोषणा दिल्या. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना! 

आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये वाद, संजू सॅमसन भडकला 

 “एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात”

 The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका