Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अंकिता लोखंडेवर भडकले चाहते; ‘या’ कारणामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे चांगलीच चर्चेत होती. अंकितानं आपल्या मेहनतीच्या जोरावर टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीपासून ते बॉलिवूड पर्यंतचा प्रवास पार केला आहे. तिनं आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

अंकितानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. यामुळे अंकिता सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अंकितानं हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत अंकितानं ग्रे रंगाचा टॉप आणि ओम प्रिंटचा पायजमा घातला आहे. तसेच अंकिताच्या आईनं केलेल्या हेअर स्टाईलमुळं ती फोटोत खूप आनंदी दिसत आहे.

मात्र, अंकितानं ओम प्रिंटचा पायजमा घातल्यामुळे अंकिताचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. अंकिताच्या चाहत्यांनी तिला असा पायजमा न घालण्याचा सल्ला दिला आहे. पायजम्यावर ओम प्रिंट असणं हा खूप मोठा अपराध केल्यासारखं आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. या फोटोमुळं अंकिता सध्या सोशल मीडियावर खूप जास्त ट्रोल होत आहे.

अंकिता लोखंडेचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनकेजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. अंकीताच्या काही चाहत्यांना अंकिताचा हा लूक प्रचंड आवडत आहे. तसेच अंकिताच्या आईनं अंकिताची केलेली हेअर स्टाईल काहींना आवडत आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर बॉलीवूड क्वीन कंगना रनौतनं बॉलिवूड मधील वाईट गोष्टींविरुद्ध जणू बंडच पुकारलं आहे. अंकिता लोखंडेनंही कंगनाला आपला पाठिंबा दिला होता. यादरम्यान अंकिताला अनेक लोकांच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागलं होतं.

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे जवळपास तीन वर्षे रिलेशनमध्ये होते. सुशांतच्या मृ.त्यूनंतर अंकितानं सुशांतचं रियाबर असणाऱ्या रिलेशनवर आपलं मत व्यक्त केलं होतं. रिया आणि सुशांतचं रिलेशन हा त्या दोघांच्या आयुष्यातील वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मला काहीही बोलायचं नाही, असं अंकितानं म्हटलं होतं. तसेच सुशांतच्या कुटुंबाकडे रियाविरुद्ध पुरावे असल्यानं सुशांतच्या कुटुंबाच्या बाजूनं मी नेहमीच असेल, असंही अंकितानं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

संबित पात्रांनी विचारला POK चा फुलफॉर्म; ‘या’ अभिनेत्रीला देता आलं नाही उत्तर!

सुशांत प्रकरणी शौविकनं अखेर मौन सोडलं; ‘या’ व्यक्तींच्या नावाचा खुलासा करत दिली महत्वाची माहिती

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतच्या फार्महाऊसवर रियापूर्वी ‘ही’ अभिनेत्री येत होती

सुशांतच्या मॅनेजरचा धक्कादायक खुलासा! सुशांतनं मृ.त्युच्या एक दिवस अगोदर केली होती ‘ही’ गोष्ट

ऐकावं ते नवलंच! कुत्र्यांमध्ये भांडण झाल्यानं ‘या’ अभिनेत्यानं पत्नीला दिला घटस्फोट