ऐन लग्नसराईत निर्बंध जाहीर! आता लग्नाला फक्त ‘इतक्या’ लोकांनाच परवानगी

मुंबई | ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाईट कर्फ्यू लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी निर्बंध लावले आहेत. अशातच आता महाराष्ट्रात देखील रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे.

अनिल परब यांनी आज विधानसभेत माहिती दिल्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबातची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या नियमावलीमध्ये लग्न समारंभावर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.

लग्न जर बंदीस्त हॉलमध्ये असेल तर तिथं उपस्थित नागरिकांची संख्या ही 100 पेक्षा जास्त असू नये, असा नियम लावण्यात आला आहे.

तसेच लग्न खुल्या जागेवर असेल तर तिथे 250 पेक्षा जास्त नागरिक असू नये किंवा क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त नागरिक असू नये, अशी नियमावली घोषित करण्यात आली आहे.

लग्न समारंभासह सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमावर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत. खुल्या जागेत 250 तर बंदिस्त जागेत 100 अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने आता केंद्र सरकार तसेच राज्य सरकार देखील अलर्ट झाल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध

 दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…

‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा

 रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”