फक्त सरपंच नव्हे तर मुख्यमंत्री सुद्धा जनतेने थेट निवडून दिला पाहिजे- अण्णा हजारे

अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशाच्या लोकशाहीविषयी महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. घटनेप्रमाणे समुदायाने निवडणूक लढवता येत नाही. ती व्यक्तीनेच लढवली पाहिजे. त्यामुळे फक्त सरपंच नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा जनतेने निवडून दिला पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं आहे.

थेट जनतेमधून सरपंच निवडला जाईल हे पाहाणं महत्वाचं आहे. जर तो तसा निवडला जात नसेल तर राज्यभर आंदोलन उभे राहणं गरजेचं आहे. लोकशाही लोकांची असते आणि ती लोकसहभागातून चालली पाहिजे, असंही अण्णा हजारे म्हणाले आहेत.

राज्य शासनाने लोकनियुक्त सरपंचपद रद्द करण्याचा घाट घातला आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा यांची भेट घेतली. यावेळी अण्णांनी याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी सध्या मौनव्रत धारण केलं आहे. त्यामुळे आपला संदेश अण्णांनी कागदावर लिहून संबंधितांना कळवला.

महत्वाच्या बातम्या-