अण्णा हजारेंची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल

पुणे | समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पुण्यातील रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अण्णा हजारे यांना छातीत दुखू लागल्याने आज सकाळी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णा यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रुबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अवधूत बोदमवाड यांनी अण्णा यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.

छातीत दुखू लागल्याने अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती बोदमवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली

मुख्यमंत्री सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरु आहे.

आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा, असं म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत 

“मोदींनी एकदा दाढी हलवल्यावर 50 लाख घरं पडतात, अन् दुसऱ्यांदा हलवली की…” 

“राष्ट्रवादीचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार” 

मोठी बातमी! नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा जोरदार झटका 

गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले…