ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत काही दिवसांपूर्वी राज्यातील वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून राज्यातील गोंधळ चांगलाच वाढला आहे.

राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी हा किराणा दुकानं आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देत असल्याचं जाहीर केलं होतं. पण सरकारच्या या निर्णयावर राज्यातील विविध स्तरातील मान्यवरांकडून जोरदार टीका होत आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारनं हा निर्णय घेतल्यावर लगेच सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अण्णा हजारे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अण्णा हजारे यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाच्या विरोधात प्राणांतिक आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्मरणपत्र पाठवली आहेत.

वाईन विक्रीला परवानगी परवानगी देताना सरकारनं युवा पिढीचा विचार केलेला दिसत नाही. मुलांच्यावर आमची खरी जबाबदारी असणार आहे. यांच्यातूनच उद्याचे महापुरूष घडणार आहेत या मुलांवर सरकारच्या या निर्णयाचा विपरित परिणाम होणार आहे, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारनं फक्त मिळणाऱ्या महसुलाचा विचार केलेला दिसत आहे. ज्या सत्तेत समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार नसेल ती सत्ता काय कामाची?, असा सवाल अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

जनतेचा विचार न करता जनतेशी न विचारता निर्णय घेणं म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाही ही लोकांच्या हिताची आहे. लोकांनी लोकसहभागातून लोकांसाठी लोकशाही चालवली पाहीजे अन्यथा आमच्यात आणि इंग्रजांमध्ये काय फरक आहे, असंही अण्णा हजारे म्हणाले आहेत.

चौथी-पाचवीतील विद्यार्थी सांगू शकतील की वाईन ही समाजासाठी घातक आहे. मग राज्य चालवणाऱ्या सरकारला हे समजू नये, असा टोलाही अण्णा हजारेंनी पत्राद्वारे सरकारला लगावला आहे.

दरम्यान, अण्णा हजारेंनी आपल्या पत्राद्वारे महाविकास आघाडीला आपण राज्यभरात एकाच वेळी आंदोलन करणार असल्याचं कळवलं आहे. राज्य सरकार आता यावर काय भूमिका घेतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 बापासाठी चिमुकली ढसाढसा रडली; पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

 प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त

 ना विराट ना माॅरिस, ‘हा’ ठरलाय IPL सामन्यातील सर्वात महागडा खेळाडू

“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ

 आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार