मुंबई | शिवसेनेवर सात्त्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना आज पुण्यात शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पुण्यातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत किरीट सोमय्यांचा रस्ता आडवला.
किरीट सोमय्या आज आयुक्तांना भेटण्यासाठी पुणे महानगरपालिकेत पोहचले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्याठिकाणी जोरदार राडा घातला आणि सोमय्यांची अडवणूक केली.
शिवसैनिक घोषणाबाजी करत असताना त्याठिकाणी धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी किरीट सोमय्या पायऱ्यावरून खाली पडले. त्यानंतर किरीट सोमय्या यांना जवळच्या संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
किरीट सोमय्या जखमी असल्याचं कळताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रूग्णालयात जाऊन सोमय्यांची भेट घेतली. रूग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीविषयी माध्यमांना माहिती दिली आहे. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांना मानसिक धक्का बसल्याचं म्हटलं आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेमध्ये जो हल्ला झाल्यानं त्यांना मानसिक धक्का बसलाय. तसेच त्यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचा बीपी अचानक वाढला होता, असं डाॅक्टरांनी सांगितलं.
रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा बीपी सातत्यानं वाढत होता. मात्र, आता बीपी कंट्रोलमध्ये आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, त्यांना मानसिक धक्का बसल्यामुळं त्याचा बीपीवर परिणाम झाला, असंही डाॅक्टरांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार
बापासाठी चिमुकली ढसाढसा रडली; पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त
ना विराट ना माॅरिस, ‘हा’ ठरलाय IPL सामन्यातील सर्वात महागडा खेळाडू
“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ