महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी; निवडणूक आयोगाने केली महत्त्वाची घोषणा

मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा (Nagar Parishad Election) आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा (Nagar Panchayat Election) कार्यक्रम जाहीर केला आहेत. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन या निवडणुकांचा मुद्दा प्रचंड गाजला होता. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप सूटलेला नाही. पण सुप्रीम कोर्टाने या निवडणुकांबाबत महत्त्वाचा आदेश दिला होता.

पावसाचं नियोजन करुन आठ-पंधरा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना कोर्टाने दिला होता. कोर्टाने 17 मे रोजी याबाबतचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायचीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषदा आणि 4 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्याबाबतची घोषणा केली आहे. ज्या नगरपरिषदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या भागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंगकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 18 ऑगस्टला मतदान आणि 19 ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक ओबीसी आरक्षणाविना होईल का यासंदर्भात तर्क वितर्क लावले जात आहे.

राज्यात आता 92 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या तर अशा परिस्थितीत राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना बंडखोर आमदारांच्या सरकारला फायदा होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे हे आमचं दैवत पण आमच्या दैवताला मातोश्रीबाहेर काढून चूक झाली” 

“एकनाथ शिंदेंना आम्ही असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी कुठेही थांबणार नाही” 

मोठी बातमी! शिदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी 

मोठी बातमी! संजय राऊतांना न्यायालयाचा सर्वात मोठा झटका 

मध्यावधी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…