मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला अटक होण्याची शक्यता

मुंबई | भाजप आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आमदार गणेश नाईक यांना नुकतंच अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. अशात भाजपच्या आणखी एका नेत्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचं दिसतंय.

आमदार जयकुमार गोरे असे अनेक आमदार अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे जयकुमार गोरे यांचा कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

साताऱ्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून आज यावर सुनावणी झाली.

महादेव पिराजी भिसे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक शेतकरी, जो मयत आहे, त्याला जीवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज केला गेला. त्यातून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केली गेली, असा आरोप जयकुमार गोरेंवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण…” 

सपना चौधरीच्या ‘या’ गाण्यावर तरुणाई फिदा, 32 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडीओ 

“खासगीकरणाची खाज वाढायला लागलीय, कुठे-कुठे खाजवणार?” 

 “महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणाऱ्या काळात निवडणुका एकत्र लढणार”

‘भोंगा आवडत नसेल तर ऐकू नका’; रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना सुनावलं