मोठी बातमी! महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत

मुंबई | महाराष्ट्रातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि बडे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. याशिवाय काही मंत्र्यांवर भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली कारवाई करण्यात आली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या जेलमध्येच आहेत. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे देखील  जेलमध्ये आहेत. अशात ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यातील तीन रस्त्यांमध्ये 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमितता केल्याला आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. याच आरोपांप्रकरणी जिल्हा न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे.

बच्चू कडूंविरोधात तपास करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती.

राज्यपालांनी तक्रार ऐकून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी न्यायालयात पुरावे सादर केले होते. त्यानंतर आता अकोला जिल्हा न्यायालयाने 24 तासांच्या आत तपास करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘ट्रेनमधून एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास….’; न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय  

ना नाश्ता, ना जेवण! सदावर्ते म्हणाले, ’18 दिवस फक्त पाणी प्यायलो’ 

“3 मे ला काही तरी घडणार असं वाटतं”, राज्यातील ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“नवनीत राणांनी D गँगशी संबंधित…”; संजय राऊतांंचा मोठा गौप्यस्फोट

“मी प्रांजळपणे कबुल करते की…”, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य