स्वत:च्याच वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात, पठ्ठ्या DJ वर नाचत बसला तोवर…

बुलडाणा | बुलडाण्यातील मलकापूर पांग्रामध्ये झालेलं लग्न सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मित्रांच्या नादात एका नवरदेवावर नवरीच गमावण्याची वेळ आली.

नवरदेव लग्न मंडपात उशिरा पाेहोचल्यानं संतप्त झालेल्या वधूकडील मंडळींनी लग्न माेडलं. एकंदरीत स्वत:च्याच वरातीत नाचणं नवरदेवाला चांगलच महागात पडलं.

मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबराेबर ठरला हाेता. दुपारी 3. 30 वाजता लग्नाचा मुहूर्त होता. त्याआधी नवऱ्याकडची मंडळी लग्नमंडपात पाेहोचणं अपेक्षित हाेतं. मात्र सगळं उलट झालं.

नवरदेवाची वरात निघाली आणि डीजे, बँडच्या तालावर थिरकणारे नवरदेवाचे मित्र मैदानात उतरले. मद्यधुंद अवस्थेत थिरकण्याच्या नादात दुपारच्या लग्नाला तब्बल चार ते पाच तास उशिर झाला.

वरात लग्न मंडपात येताच वधूच्या नातेवाइकांनी उशीर का केला, असा प्रश्न विचारला. नंतर दोन्ही बाजूंनी वादविवाद झाला.

दरम्यान, लग्न ठरवताना लग्नाचा मुहूर्त काढला जातो. पण मात्र सध्याच्या परिस्थितीत मुहूर्तावर कुठंच लग्न लागत नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘ट्रेनमधून एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास….’; न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय  

ना नाश्ता, ना जेवण! सदावर्ते म्हणाले, ’18 दिवस फक्त पाणी प्यायलो’ 

“3 मे ला काही तरी घडणार असं वाटतं”, राज्यातील ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“नवनीत राणांनी D गँगशी संबंधित…”; संजय राऊतांंचा मोठा गौप्यस्फोट

“मी प्रांजळपणे कबुल करते की…”, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य