मुंबई | भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपाने खळबळ माजली आहे. मिहीर कोटेचा यांनी ट्रेंचिंग निवदा घोटाळ्याचा आरोप शिवसेनेवर केला आहे.
मिहीभाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. यावेळी पालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक भालचंद्र शिरसाट, महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रविण छेडा आदी उपस्थित होते.
महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा यांनी महापालिका आयुक्तांना 28 ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून ट्रेंचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेच्या मदतीने काही कंत्राटदार संगनमताने घोटाळे करतील तसेच या निविदांच्या अटी आणि शर्ती बदलल्या जातील असं कळवलं होतं, असं कोटेचा म्हणालेत.
मिहीर कोटेचा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. यावेळी पालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक भालचंद्र शिरसाट, महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रविण छेडा आदी उपस्थित होते.
17 नोव्हेंबर रोजीही मिश्रा यांनी आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून निविदा प्रक्रियेतील संभाव्य घोटाळ्यांची पूर्वसूचना दिली होती, असंही मिहीर कोटेचा यांनी सांगितलं आहे.
कंत्राटदारांकडून आपसात संगनमत करून कोणत्या दरांमध्ये निविदा भरली जाईल याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला होता.
18 नोव्हेंबर रोजी निविदा सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर मिश्रा यांनी आयुक्तांना दिलेली माहिती खरी होती हेच सिद्ध झाले आहे, असं कोटेचा यांनी सांगितलं.
26 ऑगस्ट रोजी ट्रेंचिंगच्या याच कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पाच कंत्राटदारांनी या निविदेत 380 कोटींची बोली सादर केली होती. मात्र 18 नोव्हेंबर रोजी 569 कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.
अवघ्या 3 महिन्यात निविदा रकमेत एवढी मोठी वाढ झाली आहे. या घोटाळ्याची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी कोटेचा यांनी केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला
‘…आता हे सहन होत नाही’; अमृता फडणवीसांचं नवं गाणं सोशल मीडियावर ट्रोल
“कृषी कायदे मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ”
भारताला ‘विश्वगुरु’ बनवण्यासाठी मोहन भागवतांनी दिलं ‘हे’ मंत्र
‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 20 हजार बनले एक कोटी