उष्माघाताचा महाराष्ट्रात दुसरा बळी; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मृत्यू

अकोला | उन्हाळा आता तापमानाच्या (Temperature) वाढीसह सर्वांना जाणवायला लागला आहे. दिवसेंदिवस राज्यात तापमानात वाढ होत आहे. परिणामी नागरिकांना बाहेर देखील पडता येत नाही.

तापमानात वाढ होत असल्यानं नागरिकंना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अशातच एक वाईट बातमी समोर येत आहे. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

राज्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. अकोल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतातून काम करून येत असताना उन्हाचा फटका बसल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सारकिन्ही गावातील 50 वर्षीय समाधान शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. शेतात काम करताना समाधान शिंदे हे चक्कर येऊन खाली पडले.

सोबतच्या शेतकऱ्यांनी त्यांना लागलीच दवाखान्यात दाखल केले होते. त्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. परिणामी त्यांचा मृत्यू उष्माघातानं झाल्याचं डाॅक्टरांनी म्हटलं आहे.

कामानिमित्तच घराबाहेर पडा, सोबत पाणी ठेवत जा, डोक्यावर काहीतरी घेणं गरजेचं आहे, असा सल्ला सध्या डाॅक्टर सर्वांना देत आहेत.

समाधान शिंदे हे शेतकरी होते. दिवसभर शेतात ऊन असताना देखील काम केल्यानं त्यांना त्रास झाल्याचं सोबतच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘या’ भाजप नेत्याच्या अडचणी वाढल्या; ऑडिओ क्लिप व्हायरल

 उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज, शरद पवारांकडे केली तक्रार?

Sharad Pawar | “शरद पवार एक भीष्म पितामह आहेत” 

“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…” 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!