“आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA Government) आणि भाजपमध्ये (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून जोरदार वाद रंगला आहे. अशात राज्यात मोठी कारवाई ईडीकडून (ED) करण्यात आली आहे.

प्रारंभीच्या काळात राष्ट्रवादीनंतर शिवसेना आणि काॅंग्रेसशी संबंधित लोकांवर कारवाई करण्यास ईडीकडून सुरूवात करण्यात आली आहे. परिणामी राज्यात वाद वाढला आहे.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी सकाळी पहाटे पाचपासून ईडीकडून झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर उके बंधूंना ईडीनं अटक केली आहे.

उके यांच्या अटकेनंतर आता नाना पटोले आक्रमक झाले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप मुद्दाम कारवाई करत असल्याचं पटोले म्हणाले आहेत.

सौ सोनार की एक लोहार की असं आम्ही करणार आहोत. आमच्याकडं मसाला तयार आहे आम्ही थेट दणका देणार आहोत, असा इशारा नानांनी भाजपला दिला आहे.

भाजप आणि मोदींविरोधात बोलणाऱ्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. देशात सध्या अघोषित आणीबाणी लादण्यात आली आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

लोकशाहीमध्ये जनता मोठी असते. आपणच आपली पाठ थोपटून घेत असलेल्या भाजपला जनताच धडा शिकवणार आहे, असंही नाना म्हणाले आहेत.

दरम्यान, सतीश उके यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. परिणामी उकेंवरील कारवाईत फडणवीसांचा हात असल्याची टीका उके यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…” 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय! 

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा 

‘काहीही खाऊ नका, पिऊ नका’; झेलेंस्की यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना