मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोनं चांदीच्या किंमतीवर होतोय.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव वाढलेले होते. आज बुधवारी कमॉडिटी बाजारात मोठी घट पहायला मिळालं आहे.
एमसीएक्सवर आज मंगळवारी सोन्याचा भावामध्ये 110 रूपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 47, 640 रुपये इतका आहे.
चांदीच्या भावामध्ये आज जवळपास 248 रुपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 67,400 रुपये झाला आहे.
गेल्या काही आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1,900 डॉलर प्रति औंस वाढला आहे. तसेच, स्पॉट गोल्डचा भाव 1886.63 डॉलर प्रती औंस झाला आहे.
दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोनं चांदीच्या किंमतीवर होताना दिसत आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात देखील चढ उतार होताना दिसतोय. त्यामुळे येत्या काळात सोनं स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ भाजप नेत्याच्या अडचणी वाढल्या; ऑडिओ क्लिप व्हायरल
उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज, शरद पवारांकडे केली तक्रार?
Sharad Pawar | “शरद पवार एक भीष्म पितामह आहेत”
“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…”
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!