भारतात कोरोनाची आणखी एक लाट येणार?; WHO ने दिला भारताला गंभीर इशारा

नवी दिल्ली | कोरोना रूग्णसंख्येत सातत्यानं चढ-उतार पहायला मिळत आहेत. (WHO gave serious warning) जागतिक स्तरावर कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटनं मोठा धुमाकूळ घातला आहे. परिणामी सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने या आठवड्यात एक इशारा दिला होता. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. यामध्ये चीन, भारत, आशिया आणि युरोपसाठी गंभीर इशारा दिला आहे.

काही आग्नेय आशियाई देशांमध्येही वाढ होत आहे. विशेषत: भारताला सतर्क राहण्यास सांगितलं आहे. चीनमध्ये अत्यंत संसर्गजन्य स्टेल्थ ओमिक्रॉन प्रकार पसरत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

जानेवारी 2021 नंतर या आठवड्यात चीनमध्ये पहिला मृत्यू झाला आहे. हाँगकाँगमध्ये शनिवारी 16,597 नवीन रुग्ण आढळले आहेत. एक दिवस आधी हा आकडा 20,000 पेक्षा जास्त होता.

यूकेमध्ये ओमिक्राॅनमध्ये अंदाजे 20 पैकी 1 व्यक्ती सध्या संक्रमित आहे. त्यामुळे आता तेथील आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत असल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून भारतात देखील रूग्णसंख्या वाढत असल्याने आता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय. राज्यांना गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

होळीच्या दिवशी भर रस्त्यात घडली धक्कादायक घटना; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ

“तुम्ही ठरवलं तर माझा पहिला नंबर येतोच, 3 मार्कशीट जूळवून पहिले आले, आता…”

नवनीत राणांवर चढला पुष्पाचा फिवर! म्हणाल्या, “नवनीत नाम सुनके…”; पाहा व्हिडीओ

“…मग मोहन भागवत यांच्या नावापुढे ‘खान’ लावणार का?”

“देवेंद्रजी, चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”