MIMच्या प्रस्तावावर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | एआयएमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी महाविकास आघाडीसोबत युतीचा प्रस्ताव ठेवला होता. इम्तियाज जलील यांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात. मात्र ज्यांच्या सोबत जायचंय, त्या पक्षांनी तर होय म्हटलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता कोणी प्रस्तावित केला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारच्या राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच दोन दिवस मी हे वर्तमानपत्रात वाचत आहे. मात्र, आमच्या दृष्टीनं आणि माझ्या दृष्टीनं हा विषय संपला आहे, असं पवारांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्याला यासंबंधीचा निर्णय घेऊ शकता हे राष्ट्रीय समिती स्पष्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही राज्यात हा निर्णय घेता येणार नाही, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतात कोरोनाची आणखी एक लाट येणार?; WHO ने दिला भारताला गंभीर इशारा

होळीच्या दिवशी भर रस्त्यात घडली धक्कादायक घटना; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ

“तुम्ही ठरवलं तर माझा पहिला नंबर येतोच, 3 मार्कशीट जूळवून पहिले आले, आता…”

नवनीत राणांवर चढला पुष्पाचा फिवर! म्हणाल्या, “नवनीत नाम सुनके…”; पाहा व्हिडीओ

“…मग मोहन भागवत यांच्या नावापुढे ‘खान’ लावणार का?”