होळीच्या दिवशी भर रस्त्यात घडली धक्कादायक घटना; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ

लखनऊ | नुकत्याच झालेल्या धुळवडच्या दिवशी सर्वांनीच धमाल केली. अनेकांनी आपापल्या जवळच्या व्यक्तींना ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत रंग देखील लावला.

धुळवडच्या दिवशी अनेक दुर्घटना देखील घडल्या. धमाल करण्याच्या नादात अनेकांना मोठा त्रास देखील सहन करावा लागला होता. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

उत्तर प्रदेशातील बागपत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात, चालत असताना पाण्याने भरलेल्या फुग्यावर आदळल्याने ऑटो उलटला.

या ऑटोमध्ये अनेकजण होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बागपतमधील दिल्ली-सहारनपूर महामार्गावर ही घटना घडली आहे. होळी खेळत असताना तरुणांनी पाण्याने भरलेला फुगा भरधाव वेगात असलेल्या ऑटोवर फेकला.

फेकलेल्या फुगा चालकाला लागला आणि ऑटो भर हायवेवर पडली. त्यात असलेल्या अनेकांना गंभीर जखमा देखील झाल्या आहेत. सुदैवाने ऑटोच्या मागे कोणतंही वाहन नव्हतं. त्यामुळे मोठा घातपात झाला नाही.

दरम्यान, कोणतेही सण किंवा उत्सव साजरे करताना आपल्याकडून इतरांना दुखापत होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

“तुम्ही ठरवलं तर माझा पहिला नंबर येतोच, 3 मार्कशीट जूळवून पहिले आले, आता…”

नवनीत राणांवर चढला पुष्पाचा फिवर! म्हणाल्या, “नवनीत नाम सुनके…”; पाहा व्हिडीओ

“…मग मोहन भागवत यांच्या नावापुढे ‘खान’ लावणार का?”

“देवेंद्रजी, चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”